डोंगरतालमध्ये ‘आदिवासी विकास ३६०’ अंतर्गत विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्सचे प्रशिक्षण

कृतीतून शिकले विद्यार्थ्यांनी सर्किट निर्मितीचे धडे
डोंगरताल, ता. रामटेक | दि. २८ सप्टेंबर २०२६
‘आदिवासी विकास ३६०’ या उपक्रमांतर्गत रामटेक तालुक्यातील डोंगरताल येथे सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर इयत्ता ३ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.या प्रशिक्षणामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापार येथील शिक्षक श्री. सुनील विठोबा वेळेकर यांनी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्समधील मूलभूत संकल्पना अत्यंत सोप्या व प्रात्यक्षिक पद्धतीने समजावून सांगितल्या.प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना ब्रेडबोर्ड, LED, जंपर वायर, बझर आणि बॅटरी या घटकांची ओळख करून देण्यात आली. या घटकांचा योग्य वापर करून ‘सर्किट’ म्हणजे काय, सर्किट कसे जोडले जाते आणि विद्युत प्रवाहामुळे LED व बझर कसे कार्य करतात, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.विशेष म्हणजे, केवळ माहिती ऐकण्याऐवजी विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करून सर्किट तयार केले. स्वतः तयार केलेले सर्किट कार्यान्वित झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह हा प्रशिक्षणाचा विशेष आकर्षण ठरला. ‘करून शिकणे’ (Learning by Doing) या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्सची संकल्पना अधिक सहज आणि आनंददायी पद्धतीने समजली.


ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स आणि नवोपक्रमाची प्रत्यक्ष ओळख करून देणे, हा ‘आदिवासी विकास ३६०’ उपक्रमाचा उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होत आहे.या प्रशिक्षणासाठी पालक श्री. कैलास बादशाह यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना गावातच प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षणाचा अनुभव मिळाला.डोंगरतालसारख्या ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना ‘पुस्तकातून ज्ञान’ ते ‘कृतीतून कौशल्य’ या दिशेने घेऊन जाणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Scroll to Top